पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ; चोवीस तासांत विविध भागातून पळविल्या पाच दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 12:43 PM2020-12-14T12:43:46+5:302020-12-14T12:44:20+5:30
वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने वाहनचालक धास्तावले.
पिंपरी : वाहनचोरटे सुसाट असून, शहरातील विविध भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने वाहनचालक धास्तावले आहेत.
दत्तात्रय तुळशीराम फुले (वय ५०, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.
गजानन केरबाजी घोडके (वय ३६, रा. आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची २० हजारांची दुचाकी खडी मशीन रोड, चऱ्होली फाटा येथे एका झाडाजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.
महेश रामचंद्र पोकळे (वय २९, रा. घोरपडी), नितीन राजकपूर खंडारे (वय ३३, रा. जुनी सांगवी) आणि नवनाथ तुकाराम शिंदे (वय ३५, रा. पिंपरी) या तिघांनी दुचाकी चोरीप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोकळे यांची ५० जारांची दुचाकी सुदर्शन नगर, पिंपळे गुरव येथून चोरीला गेली. खंडारे यांची २५ हजारांची दुचाकी जयमाला नगर, जुनी सांगवी येथून चोरीला गेली. तर शिंदे यांची २५ हजारांची दुचाकी पिंपळे साैदागर येथून चोरीला गेली.
चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरची चोरी
चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीला गेल्याचे दोन प्रकार घडले. दामिनी तुषार सुरवाडकर (वय ३७, सध्या रा. इंद्रायणी नगर, भोसरी, मूळ रा. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुरवाडकर यांच्या चारचाकीचा १२ हजारांचा सायलेन्सर चोरट्यांनी काढून चोरून नेला. प्रवीण दत्तात्रय पिंगळे (वय २६, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंगळे यांच्या चारचाकीचा एक हजार रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी काढून चोरून नेला.