पिंपळे सौदागरमध्ये आहे ' या ' फ्लेक्सची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 05:25 PM2018-08-17T17:25:39+5:302018-08-17T17:33:08+5:30
शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर 'shivade i am sorry' असा मजकूर असलेले फलक लावले आहेत. सुमारे १४ ते १५ फलक लावले आहेत.
पिंपरी चिंचवड : - उच्चभ्रु अशी ओळख असलेल्या पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात 'shivade i am sorry''असा मजकूर लिहिलेले फळक झळकले आहेत. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान हे फलक लावले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हे फलक पिंपळे सौदागर परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
पिंपळे सौदागर या परिसरात उच्चभ्रू वसाहतींची संख्या अधिक आहे. संगणक अभियंते या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर 'shivade i am sorry' असा मजकूर असलेले फलक लावले आहेत. सुमारे १४ ते १५ फलक लावले आहेत. हे फलक चर्चेचा विषय विषय ठरत आहेत. कोणत्या प्रेमवीराने हे फलक लावले आहेत, या चचेर्ला उधाण आले आहे.
दरम्यान, फलक कोणी लावले आहेत, हे अद्याप समोर आले नसून परिसरातील 'सीसीटीव्ही' कॅमेरे तपासले जात असल्याचे, स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.