मोशीत स्मशानभूमीत शिरले पुराचे पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 08:35 PM2019-08-05T20:35:17+5:302019-08-05T20:36:18+5:30
मुसळधार पावसामुळे माेशीतील स्मशानभूमीत पुराचे पाणी शिरले आहे.
मोशी : मावळ तालुक्यात वडीवळे, उकसान, आंद्रा धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे इंदोरी, निघोज, मोशी, मोई, कुरुळी, चिंबळी, डुडुळगाव, आळंदी, चऱ्होली आदी ठिकाणी पुरामुळे पाणीच पाणी झाले आहे. इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी गाठल्याचे दिसून येत आहे. मोशी येथे पुराचे पाणी स्मशानभूमीत शिरले आहे.
देहू रस्ता येथील सिटी प्राईड स्कूल समोरचा रस्ता देखील पाण्याखाली आहे. महापालिकेने तात्काळ देहू रस्ता येथील परिस्थिती पूर्वपदावर आणली. दिवसभर संततधार चालूच असल्याचे जनजीवन काहीशी विस्कळीत झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी रस्त्यावरील छोट्या दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये पाणी शिरले. महापालिकेच्या वतीने घाटावर सूचना फलक लावण्यात आले असून येथील जुना दगडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मोशी परिसरातही मुसळधार पावसाने गेल्या चार दिवसांपासून जोरदार हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी गाठल्याचे दिसून येत आहे. काठावरील शेती, स्मशान भूमी, दशक्रिया घाट पाण्याखाली आहे. वाहतुकीसाठी बंद असलेला ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदी काठावर बघ्यांची गर्दी वाढत असून सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुना पुलाच्या कठड्यापर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. पाऊस सुरूच राहिला तर जुन्या पुलावरून पाणी जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.