मुळा, पवना नदीला पूर; झोपड्यांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 06:30 AM2017-08-31T06:30:35+5:302017-08-31T06:30:46+5:30
मावळ आणि मुळशी भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रा शेजारी असलेल्या मुळानगर झोपडपट्टीत पाणी शिरले
पिंपरी : मावळ आणि मुळशी भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने जुनी सांगवी येथील मुळा नदीपात्रा शेजारी असलेल्या मुळानगर झोपडपट्टीत पाणी शिरले असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभागाच्या अधिकाºयांनी २० झोपडपट्टयांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलिवले. तसेच पवना आणि इंद्रायणी नद्यांचीही पाणीपातळी वाढली आहे.
आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. मावळ आणि मुळशीतील धरणे फुल भरली आहेत. पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण फुल झाल्याने मंगळवारपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. मावळातील वलवण, भुशी, लोणावळा डॅम फुल झाले आहेत. भामा आसखेडही फुल झाले आहे. पवना, मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मंगळवारी मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तीस हजार क्युसेक पाणी मुळा नदीत सोडले आहे. त्यामुळे सांगवी येथे मुळा नदी पात्रात असलेल्या मुळानगर झोपडपट्टीत पाणी शिरले होते. पवना
नदीची पाणीपातळी वाढली आहे. धरणातून सात हजार आठशे
क्युसेक पाणी सोडले आहे. त्यामुळे चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले होते. पिंपरीतील नदीकाठच्या परिसरात सर्तकतेचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या सतर्क असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशामक विभागाच्या अधिकाºयांनी सांगवीतील मुळानगर भागात जाऊन त्वरित झोपडपट्टीतील पन्नास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. हे कार्य रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होते. या नागरिकांची मुळानगर आणि जुनी सांगवीतील नागरिकांना अहिल्यादेवी होळकर शाळेत तात्पुरत्या स्वरूपात सोय केली आहे. या ठिकाणी जवळपास दीडशे झोपडपटट््या आहेत. पालिकेच्या शाळेत त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच दापोडी गुलाबनगर भागातील बाधित १४ झोपडट्ट््यांतील नागरिकांना हुतात्मा भगतसिंग शाळेत स्थलांतरित केले आहे.
पावसाळा सुरू होताच आपत्तीनिवारण कक्ष सज्ज झाला आहे. मुळानगर झोपडपट्टीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाणी शिरले होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाºयांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पालिकेने त्यांची तात्पुरती राहण्याची सोय देखील केली आहे. आपण स्वत: त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त