माजी नगरसेवक अनंत को-हाळेंवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 04:05 AM2018-03-04T04:05:04+5:302018-03-04T04:05:04+5:30
माजी नगरसेवक अनंत को-हाळे यांच्यासह तीन जणांनी एकास मारहाण केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचवड : माजी नगरसेवक अनंत को-हाळे यांच्यासह तीन जणांनी एकास मारहाण केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक अनंत को-हाळे यांच्यासह चंद्या, चंद्याचा भाऊ (पूर्ण नावे समजली नाहीत) व प्रसाद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सागर रमेश कोंडे (वय ४२, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कोंडे काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळ थांबले होते. त्या वेळी तेथे आलेल्या प्रसाद जाधव याने तुम्ही येथे कशाला आले आहात, येथे परत दिसल्यास तुमचे हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच चंद्या याने दातºया असलेल्या मुठीने कोंडे यांच्या डोक्यात मारहाण केली. कोºहाळे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतर साथीदारांनीही लाथा मारल्या, अशी फिर्याद कोंडे यांनी दिली आहे.
- महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चिंचवडमधील केशवनगर भागातून कोºहाळे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) तिकिटावर कोºहाळे यांनी ही निवडणूक लढविली होती. गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्यांचा पराभव झाला होता.