दुचाकी जाळल्याप्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा
By admin | Published: March 8, 2017 05:02 AM2017-03-08T05:02:39+5:302017-03-08T05:02:39+5:30
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणात गाडी जाळल्याचा राग मनात धरून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ व त्यांच्या सात-आठ कार्यकर्त्यांनी तरुणाला मारहाण करून त्याची दुचाकी
पिंपरी : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणात गाडी जाळल्याचा राग मनात धरून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ व त्यांच्या सात-आठ कार्यकर्त्यांनी तरुणाला मारहाण करून त्याची दुचाकी जाळली. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मुळशी परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी ओव्हाळ याच्यासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ओमकार भंगारे (वय १६, रा. पुनावळे, मुळशी) या
तरुणाने वाकड पोलीस
ठाण्यात शेखर ओव्हाळ,
मुन्ना ओव्हाळ, रितेश ओव्हाळ, सॅण्डी ओव्हाळ, अजय ओव्हाळ, बारीक ओव्हाळ व अन्य आरोपीविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. (प्रतिनिधी)
ओमकार भंगारे व त्याचे मित्र अनिकेत हे दुचाकी घेऊन मुळशीतील ‘लंडन ब्रिज’ला गेले होते. तेथे गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी मोटारीतून आलेल्या सात-आठ जणांच्या टोळक्याने ओमकार व अनिकेतला शिवीगाळ केली.
जीवे मारण्याची धमकी देत त्यांना जबरदस्तीने मोटारीत बसविले. अनिकेतची दुचाकी घेऊन पुढे गेले. तेथे पेट्रोल टाकून त्यांनी दुचाकी जाळली. या घटनेनंतर शेखर ओव्हाळ व इतर आरोपी बेपत्ता झाले आहेत. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी सांगितले.