पिंपरीत आठवले गटाच्या माजी शहराध्यक्षास अटक; तरुणाचा केला होता खून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 02:28 PM2021-08-11T14:28:20+5:302021-08-11T14:32:18+5:30
तरुणाला वारंवार वेडा चिडवल्यावरून झाला होता वाद
पिंपरी : पिंपरी परिसरातील डिलक्स चौकात एका टोळक्याकडून तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरपीआय (आठवले गट) माजी शहराध्यक्ष सुरेश ऊर्फ चिम्या निकाळजे याला मंगळवारी (दि. १०) पोलिसांनीअटक केली.
मनोज राजू कसबे (वय २५, रा. मिलिंदनगर, पिंपरी), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरपीआयचा माजी शहराध्यक्ष चिम्या ऊर्फ सुरेश निकाळजे, काळ्या ऊर्फ सचिन निकाळजे, शौकत समीर शेख या तिघांना अटक करण्यात केली आहे. तर मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल व त्यांच्या इतर साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत मनोज यांच्या आई पुष्पा राजू कसबे (वय ५०, रा. पिंपरी) यांनी रविवारी (दि. ८) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मनोज राजू कसबे पिंपरीतील मिलिंदनगर परिसरात वास्तव्याला होता. आरोपींच्या टोळक्याकडून मनोजला वारंवर वेडा म्हणून चिडवलं जात होतं. याच रागातून मनोजनं टोळक्याच्या अंगावर धावून जात त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असता, टोळक्यानंच मनोजला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यातच मनोजचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.