मुळशीतील आयटी पार्क असलेल्या माण गावात चार घरफोड्या; बंद घरे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:50 PM2017-11-28T12:50:37+5:302017-11-28T12:54:22+5:30

माण (मुळशी) गावात मध्यरात्री चार घरफोड्या झाल्या चोरट्यांनी कुलूप असलेल्या घरांना लक्ष्य करीत काही रोख रक्कम व किरकोळ वस्तू पळविल्याची प्राथमिक माहिती आहे.

Four burglary cases in Man village, Mulshi; Closed homes target | मुळशीतील आयटी पार्क असलेल्या माण गावात चार घरफोड्या; बंद घरे लक्ष्य

मुळशीतील आयटी पार्क असलेल्या माण गावात चार घरफोड्या; बंद घरे लक्ष्य

Next
ठळक मुद्देकुलूप असलेल्या घरांना लक्ष्य करीत रोख रक्कम, किरकोळ वस्तू पळविल्याची प्राथमिक माहितीसीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपासास सुरूवात

वाकड : आयटी पार्क वसलेले आणि हायटेक ग्रामपंचायत अशी ख्याती मिळविलेल्या माण (मुळशी) गावात मध्यरात्री चार घरफोड्या झाल्या चोरट्यांनी कुलूप असलेल्या घरांना लक्ष्य करीत काही रोख रक्कम व किरकोळ वस्तू पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र काय वस्तू, मुद्देमाल व रोख रक्कम किती याचा ठोस आकडा पोलिसांच्या हाती लागला नाही. 
ग्रामपंचायती शेजारील वाघुलकरांचे दोन घरांचे आणि खोले चाळीतील दोन भाडेकरूंच्या दोन खोल्यांचे कुलूप तोडून व कडी-कोयंडा उचकटू चोरट्यांनी प्रवेश करीत घरफोड्या केल्या. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत. मान-हिंजवडी भागात वाढत्या औद्योगिकीरणामुळे रोजगारासाठी बाहेरून आलेला मोठा कामगार वर्ग चाळ्यांमध्ये वास्तव्यास आहे. मात्र हे कामगार तीन शिफ्ट मध्ये काम करीत असल्याने पाळत ठेवून चोर योजना आखत आहेत.

Web Title: Four burglary cases in Man village, Mulshi; Closed homes target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.