चार दिवस बाळाचा मृतदेह शवागारात

By admin | Published: March 27, 2017 02:37 AM2017-03-27T02:37:39+5:302017-03-27T02:37:39+5:30

उपचार सुरू असतानाच नवजात अर्भक दगावले. मृत अर्भक शवागारात ठेवून मातेने रुग्णालयातून पळ काढला.

Four days of child's body in the mortuary | चार दिवस बाळाचा मृतदेह शवागारात

चार दिवस बाळाचा मृतदेह शवागारात

Next

पिंपरी : उपचार सुरू असतानाच नवजात अर्भक दगावले. मृत अर्भक शवागारात ठेवून मातेने रुग्णालयातून पळ काढला. ती पुन्हा फिरकलीच नाही. पित्याने तर अगोदरच रुग्णालयाकडे पाठ फिरवली होती. गेल्या चार दिवसांपासून पिंपरी महापालिकेच्या वासयीएम रुग्णालयातील शवागारात अर्भकाचा मृतदेह पडून आहे. तो नेण्यास कोणीच फिरकलेले नाही. त्यामुळे त्या मृतदेहाचे करायचे काय, असा पेच रुग्णालय व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील धामणगावामधील एक महिला पिंपरी-चिंचवडमध्ये काम करते. ९ मार्चला या महिलेने वायसीएममध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र जन्मानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तिला आॅक्सिजन लावण्यात आला. रुग्णालयात ठेवण्याची गरज नाही. बाळाला ताब्यात द्या, अशी मागणी पालकांनी केली. ‘व्हेंटिलेटर’वरून काढल्यास काहीही घडू शकेल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. बाळाला त्यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला.
मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कोणीही आले नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पालकांशी फोनवरून संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)
मृतदेहाचे करायचे काय?
डॉक्टरांशी वादंग झाल्याच्या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी रुग्णालयात येणेच बंद केले. प्रसूतीनंतर आई त्याच रुग्णालयातच उपचार घेत होती. २२ मार्चला उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत बाळाला ताब्यात घ्यावे, असे तिच्या आईला सांगितले. परंतु रात्रीच्या वेळी अशा परिस्थितीत घरी कसे जाऊ, असा मुद्दा उपस्थित करून मृतदेह शवागारात ठेवला.

Web Title: Four days of child's body in the mortuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.