कोंबडीला चक्क चार पाय, उत्सुकतेपोटी नागरिकांची उसळली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 01:21 AM2018-09-09T01:21:53+5:302018-09-09T01:23:44+5:30
आपल्या मालकाला प्रेमाने अण्णा आणि भाऊ अशी हाक मारणारा कोंबडा सांगली जिल्ह्यात आहे.
निगडी : आपल्या मालकाला प्रेमाने अण्णा आणि भाऊ अशी हाक मारणारा कोंबडा सांगली जिल्ह्यात आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. असेच काहीसे वैशिष्ट्य असलेली कोंबडी निगडीत आहे. या कोंबडीला चक्क चार पाय आहेत. एका कोंबडी विक्रेत्याकडे ती आढळून आली.
निगडीतील अंकुश चौकातील कोंबडी विक्रेते कुतबुद्दीन होबळे यांनी विक्रीसाठी शनिवारी सकाळी ७० कोंबड्या खरेदी केल्या. त्यातील एका कोंबडीला चार पाय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चार पायांची कोंबडी पाहण्यासाठी गर्दी उसळली. कोंबडीला चार पाय कसे, असा प्रश्न उपस्थित करून अनेक जण उत्सुकतेपाटी ही कोंबडी पाहण्यासाठी दुकानात गर्दी करीत आहेत.
>चार पायांची कोंबडी पहिल्यांदाच पाहण्यात आली. कोंबडीला चार पाय असणे जणू नैसर्गिक चमत्कारच आहे. सकाळपासून माझ्या दुकानात ही कोंबडी पाहण्यासाठी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक गर्दी करीत आहेत. मी कोंबडीचे संगोपन करणार आहे.
- कुतबुद्दीन होबळे, विक्रेता