आळंदी येथे देशी बनावटीच्या पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 03:23 PM2020-03-17T15:23:30+5:302020-03-17T15:28:36+5:30

तडीपार गुन्हेगार जेरबंद 

Four live cartridges and pistol seized | आळंदी येथे देशी बनावटीच्या पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे जप्त

आळंदी येथे देशी बनावटीच्या पिस्तुलासह चार जिवंत काडतुसे जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देखंडणी दरोडा विरोधी पथकाची कामगिरीदिघी पोलीस ठाण्यात तीन, आळंदी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल

पिंपरी : एका तडीपार गुन्हेगारास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.अविनाश बाळू धनवे (वय २८, रा. वडमुखवाडी, चऱ्होली ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. तडीपार गुन्हेगार अविनाश धनवे हा लग्नाच्या कार्यक्रमासाठी आळंदी येथे आला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धनवे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा ३० हजार ८०० रुपयांचा ऐवज मिळून आला. तो ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. धनवे याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात तीन, आळंदी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तसेच त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. असे असतानाही त्याने तडीपारीच्या आदेशाचा भंग करून पुणे जिल्ह्यात प्रवेश केल्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी आशिष बनकर, गणेश कोकणी, सुधीर डोळस, राजेश कौशल्ये यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title: Four live cartridges and pistol seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.