किरकोळ कारणावरून चार जणांचे एकमेकांवर कोयत्याने वार; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 02:04 PM2021-07-13T14:04:35+5:302021-07-13T14:04:51+5:30

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे

Four men stabbed each other for petty reasons; Record of two different crimes | किरकोळ कारणावरून चार जणांचे एकमेकांवर कोयत्याने वार; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

किरकोळ कारणावरून चार जणांचे एकमेकांवर कोयत्याने वार; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

Next

पिंपरी: भोसरी एमआयडीस, फुलेनगर येथे चार जणांनी किरकोळ कारणावरून दोघांवर खुनी हल्ले केले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

डीप्श्या उर्फ सुरज गायकवाड, जावेद नदाफ (दोघे रा. फुलेनगर, एमआयडीसी भोसरी), अजय ससाणे, अण्ण्या हजारे ( पूर्ण नाव माहिती नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पहिल्या प्रकरणात आता प्रवीण बबन लांडगे (वय २३, रा. फुलेनगर, एमआयडीसी) भोसरी यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास सुरज गायकवाड याने लांडगे यांना 'तू आमच्याकडे का बघतो, तुला लय माज आला का? तुला खल्लास करून टाकतो' अशी दमबाजी केली. त्यानंतर सुरज गायकवाड आणि जावेद नदाफ या दोघांनी लांडगे यांना हाताने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयत्याने वार केले. तर अन्य दोन   आरोपींनी लांडगे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या प्रकरणात अस्लम हनीफ चाकोरे (वय ३२ , रा. फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी चाकोरे यांचा मेहुणा आमीर याला मारहाण केली. त्याचा चाकोरे यांनी आरोपींना जाब विचारला. त्यावरून सुरज गायकवाड आणि जावेद नदाफ यांनी चाकोरे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने शस्त्राने डोक्यावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. अन्य आरोपींनी चाकोरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Four men stabbed each other for petty reasons; Record of two different crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.