पिंपरी-चिंचवडमध्ये चार पोलीस कर्मचारी निलंबित; अवैध धंदे रोखण्यात अपयश आल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 04:44 PM2022-11-26T16:44:48+5:302022-11-26T16:45:35+5:30

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची कारवाई...

Four police personnel suspended; Blamed for failure to prevent illegal activities | पिंपरी-चिंचवडमध्ये चार पोलीस कर्मचारी निलंबित; अवैध धंदे रोखण्यात अपयश आल्याचा ठपका

पिंपरी-चिंचवडमध्ये चार पोलीस कर्मचारी निलंबित; अवैध धंदे रोखण्यात अपयश आल्याचा ठपका

Next

पिंपरी : अवैध धंदे रोखण्यास अपयश आल्याचा ठपका ठेवून निगडी पोलिस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली. सतीश जालिंदर, विलास केकाण, राहुल मिसाळ, नितीन सपकाळ असे निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानंतर देहुरोड, निगडी आणि वाकड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील लॉटरी सेंटर, व्हिडिओ गेम पार्लर, सोरट जुगार अड्यांवर १५ नोव्हेंबरला पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल ३९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते. या धंद्याला अभय देणाऱ्या पोलिसांविरोधात त्यानंतर पोलिस आयुक्तांनी कारवाईचे संकेत देत संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचारी, अधिकारी यांच्या अंतर्गत बदल्या केल्या.

निगडीचे पोलिस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तर, तीन सहायक निरीक्षकांसह २१ पोलिस कर्मचाऱ्यांची वाहतूक विभागाअंतर्गत बदली करण्यात आली. निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक पाच अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आयुक्तांनी निगडी पोलिस ठाण्यातून अहवाल मागवला होता. त्या अहवालानुसार निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांवर अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी होती. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळे कामात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवून आयुक्तांनी चारही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

Web Title: Four police personnel suspended; Blamed for failure to prevent illegal activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.