निगडी गावठाणात चौरंगी लढत

By admin | Published: February 13, 2017 05:54 PM2017-02-13T17:54:39+5:302017-02-13T17:54:39+5:30

निगडी गावठाणात चौरंगी लढत

Four times in the Nigdi village | निगडी गावठाणात चौरंगी लढत

निगडी गावठाणात चौरंगी लढत

Next

 

 

पिंपरी : निगडी गावठाण प्रभागात विविध जागांतून पाच विद्यमान नगरसेवक रिंगणात आहेत. ‘क’ जागेसाठी तीन विद्यमान नगरसेविकांसह माजी स्थायी समिती सभापती एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे या जागेसाठी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

प्रभाग १३ क्रमांकमध्ये निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक २२, ओटा स्कीम, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ, श्रीकृष्ण मंदिर, साईनाथनगर आदी परिसर येतो. ५५ हजार ७४ मतदारसंख्या आहे. या प्रभागात उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय आणि गरीब मतदार असून विस्तारही मोठा आहे. ‘क’ जागेसाठी चौरंगी लढत होत आहे. येथून शिवसेनेच्या सुलभा उबाळे, भाजपाच्या संगीता पवार, मनसेच्या अश्विनी चिखले या तीन विद्यमान नगरसेविकांसह राष्ट्रवादी काँगे्रसकडून माजी स्थायी समिती सभापती सुमन पवळे रिंगणात आहेत. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. यासह येथून काँगे्रसच्या राखी टाक, तर एमआयएमकडून मैमुना शेख या उमेदवार आहेत. 

‘ड’ जागेसाठी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, राष्ट्रवादीकडून विद्यमान नगरसेवक तानाजी खाडे, शिवसेनेचे रजनीकांत क्षीरसागर, तर भाजपाकडून दीपक मोढवे रिंगणात आहेत. मोढवे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेमधून भाजपामध्ये उडी घेतली आहे. दरम्यान, येथे प्रस्थापित विरुद्ध नवखे अशी लढत होणार आहे. ‘अ’ जागेसाठी शिवसेनेकडून अनु गवळी, भाजपाकडून कमल घोलप, राष्ट्रवादीकडून सुषमा खाडे यांच्यात लढत होणार आहे. ‘ब’ जागेसाठी विद्यमान नगरसेविका शुभांगी बोºहाडे, भाजपाचे उत्तम केंदळे, मनसेचे राजू खाडे, राष्ट्रवादीचे राहुल येवले यांच्यात लढत आहे. बोºहाडे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेत उडी घेतली आहे. 

 

Web Title: Four times in the Nigdi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.