पिंपरी शहरात वाहन चोरटे सुसाट; चारचाकीसह पळविल्या दोन दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 07:20 PM2021-03-08T19:20:55+5:302021-03-08T19:21:42+5:30

घरासमोरून होतेय वाहनांची चोरी

four wheeler and 2 two-wheelers's theft in pimpri city | पिंपरी शहरात वाहन चोरटे सुसाट; चारचाकीसह पळविल्या दोन दुचाकी

पिंपरी शहरात वाहन चोरटे सुसाट; चारचाकीसह पळविल्या दोन दुचाकी

Next
ठळक मुद्देअज्ञात चाेरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : वाहनचोरीच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करूनही शहरात वाहनचोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनचोरटे सुसाट असल्याचे दिसून येते. चोरट्यांनी दोन दुचाकी तसेच एक चारचाकी अशी तीन वाहने चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अज्ञात चाेरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप कमारसीताराम भारती (वय ५०, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचा मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी फिर्यादी यांची दुचाकी घेऊन गेला. भोसरी गावातील राजमाता काॅलेजच्या समोर रस्त्यावर त्याने दुचाकी पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीची ती दुचाकी चोरून नेली. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी सव्वानऊ ते सव्वादहाच्या दरम्यान वाहनचोरीचा हा प्रकार घडला.

जयदीप साहेबराव थोरात (वय ३९, रा. बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी लाॅक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार २ ते ५ मार्च दरम्यान हा प्रकार घडला. 

नवनाथ कन्हैयालाल भूमकर (वय ३६, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांच्या राहत्या घरी त्यांचे तीन लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन पार्क केले होते. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार रविवारी दुपारी चार ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडला. 

चारचाकी वाहनाच्या सायलेन्सरची चोरी

मनोज कुमार बादरमल जैन (वय ४०, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे चारचाकी वाहन शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेनऊ ते शनिवारी (दि. ६) सकाळी आठच्या दरम्यान भोसरी येथील भगवती अ‍ॅटोमोबाइल्स या दुकानासमाेरील मोकळ्या जागेत पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांच्या चारचाकीचा १५ हजार रुपये किंमतीचा सायलेन्सर काढून चोरून नेला.

Web Title: four wheeler and 2 two-wheelers's theft in pimpri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.