वेबसाईटवरून ओळख करून 6 लाख 70 हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 06:01 PM2019-07-28T18:01:02+5:302019-07-28T18:02:50+5:30
भावास नाेकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला 6 लाख 70 हजार रुपयांना फसविल्याचे समाेर आले आहे.
पिंपरी : एका वेबसाईटवरून ओळख करून जवळीक करून भावास एअर इंडियामध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून 6 लाख 70 हजारांची फसवणूक केली. 10 मार्च ते 9 जून 2019 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रेश्मा अजीज खान (वय 37, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल रौफ हसवारे (वय 42 , मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रेश्मा खान यांच्याशी एका वेबसाईटवरून ओळख वाढवून आरोपी हसवारे याने त्यांच्याशी जवळीक केली. भावास नोकरी लावून देतो, असे फिर्यादी रेश्मा यांना आमिष दाखविले. वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून 6 लाख 70 हजार रुपये घेऊन फिर्यादी रेश्मा यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.