'OLX'वर डिलरशीपची जाहिरात देऊन फसवणूक; पिंपरीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 03:55 PM2021-05-25T15:55:11+5:302021-05-25T15:55:24+5:30

विश्वास संपादन करून लाख रुपयांची फसवणूक....

Fraud by advertising dealerships on OLX; Filed a crime in Pimpri | 'OLX'वर डिलरशीपची जाहिरात देऊन फसवणूक; पिंपरीत गुन्हा दाखल

'OLX'वर डिलरशीपची जाहिरात देऊन फसवणूक; पिंपरीत गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : 'ओएलएक्स' वर जाहिरात देऊन डीलरशीप देण्याचे सांगितले. तसेच विश्वास संपादन करून एकाची एक लाख रुपयांना फसवणूक केली. फसवणुकीची पहिली घटना २ ते १७ ऑगस्ट २०२० तर दुसरी घटना १ ते २१ जानेवारी २०२१ या कालावधीत चिंचवड येथे घडली.

प्रतिक प्रवीण कांकरिया (वय ३०, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. २५) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ई टू शॉपी कंपनीचे कृष्णा ठाकूर व इंडिया शॉपिंग बाजार या कंपनीचे अनुश्री पाटीदार आणि सुजल पटवा (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ई टू शॉपी कंपनीचे कृष्णा ठाकूर यांनी २ ऑगस्ट २०२० रोजी ओएलएक्स या ॲपवर ई टू शॉपी कंपनीची पुणे जिल्ह्यासाठी डिलरशीप देण्याबाबत जाहिरात दिली. त्यासाठी एसबीआय बॅंकेच्या खात्यावर २५ हजार रुपये सुरक्षा रक्कम म्हणून घेतली. मात्र कोणतीही डिलरशीप न देता फसवणूक केली. तसेच इंडिया शॉपिंग बाजार या कंपनीचे अनुश्री पाटीदार आणि सुजल पटवा यांनी २ जानेवारी २०२१ रोजी ओएलएक्सवर कंपनीची डिलरशिप देण्याची जाहिरात पाठविली. त्यासाठी सुरक्षा अनामत म्हणून ७५ हजार रुपये घेतले. तसेच कंपनीचे कोणतेही प्रोडक्ट न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता आरोपींनी वरील दोन्ही घटनांमध्ये फिर्यादीची एक लाख रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करीत आहेत.

Web Title: Fraud by advertising dealerships on OLX; Filed a crime in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.