माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नावाने कॉल लेटर देऊन फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:17 PM2022-07-29T20:17:14+5:302022-07-30T12:06:45+5:30
देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
पिंपरी : माजी मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय सचिव यांच्या सहीचे कॉल लेटर देऊन एकाची तब्बल सात लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. हा प्रकार देहुगाव, पुणे, नाशिक आमदार निवास येथे घडला.
या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गणपत एकनाथ गिते (वय ३७, मोशी, ता.हवेली) यांनी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी आरोपी शुभम सुनील पाटील (वय २६, रा. अमळनेर, जि. जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागात चालक म्हणून नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. नोकरीसाठी ऑनलाइन आणि रोख स्वरुपात आरोपीने फिर्यादीकडून सहा लाख ६६ हजार ५०० रुपये घेतले. या बदल्यात आरोपीने तत्कालीन मंत्री अमित देशमुख आणि वैद्यकीय सचिव यांच्या नावाची खोटी सही असलेले कॉल लेटर दिले.