दाजी आणि मेव्हण्याने साॅफ्टवेअर कंपनीला घातला पाच लाखाला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 08:50 PM2019-06-23T20:50:42+5:302019-06-23T20:51:39+5:30

संगणक अभियंता दाजी आणि मेहुण्याने मिळून एका सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीला ५ लाखांचा गंडा घातला.

fraud of five lakh | दाजी आणि मेव्हण्याने साॅफ्टवेअर कंपनीला घातला पाच लाखाला गंडा

दाजी आणि मेव्हण्याने साॅफ्टवेअर कंपनीला घातला पाच लाखाला गंडा

Next

पिंपरी : संगणक अभियंता दाजी आणि मेहुण्याने मिळून एका सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीला ५ लाखांचा गंडा घातला. ही घटना बालेवाडीतील कन्सीसटंन्सी प्रायवेट लिमिटेड या टेंडरिंग आणि ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या कंपनीत घडली.

याप्रकरणी कंपनीचे मालक अजित अर्जुन कदम (वय ३६, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, सायबर सेलच्या पोलिसांनी मुख्य सूत्रधार संगणक अभियंता प्रवीण विष्णुदास राठी याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संगणक अभियंता प्रवीण राठी हा बालेवाडीतील एका सॉफ्टवेअर बनवण्याच्या कंपनीत काम करत होता. दरम्यान, त्याच कंपनीत टेंडरिंग आणि ऑनलाइन व्यवहार केले जायचे. त्यासाठी फिर्यादी अजित अर्जुन कदम यांनी बालेवाडी येथील बँकेचे खाते लिंक केलेले होते. सर्व व्यवहार त्या बँक खात्यामधून व्हायचे.

ज्या सॉफ्टवेअर मधून हे सर्व व्यवहार केले जात त्याचा पासवर्ड आणि युजरनेम हा आरोपी राठीला माहीत होता. त्याचा गैरवापर करून त्याने आपल्या परराज्यातील मेहुण्याला सोबत घेऊन वेगवेगळ्या पाच बँक खात्यात ५ लाख ९ हजार रुपये पाठवले. याची तक्रार फिर्यादी अजित कदम यांनी सायबर सेलकडे केली होती. त्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या पथकाने केला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी प्रवीण राठीला अटक केली आहे. तर त्याचा मेहुणा नवनीत हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: fraud of five lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.