ट्रेडिंग खात्यातील २४ लाख ५० हजारांची परस्पर गुंतवणूक करून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 03:01 PM2019-09-08T15:01:41+5:302019-09-08T15:02:44+5:30
शेअर मार्केटमध्ये वेळाेवेळी 24 लाख 50 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून आराेपीने परस्पर या रकमेची गुंतवणूक करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये २४ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच ट्रेडिंग खात्यातून परस्पर गुंतवणूक करून नुकसान केले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अनिता झेवियर (वय ४७, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जोसेफ पॉल (वय ४७) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी २०१७ ते जून २०१८ दरम्यान हा प्रकार घडला.
आरोपी जोसेफ पॉल याने फिर्यादी अनिता यांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये वेळोवेळी २४ लाख ५० हजार रुपये गुंवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी अनिता यांनी त्यांच्या ट्रेडिंग खात्याचा पासवर्ड आरोपी जोसेफ याला विश्वासाने दिला होता. मात्र त्यांची परवानगी न घेता या खात्यातील रक्कम जोसेफ याने परस्पर कुठेतरी गुंतवणूक करून या रक्कमेचे नुकसान करून फिर्यादी अनिता यांचा विश्वासघात केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.