चिंचवडमध्ये शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून साडेसात लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 04:00 PM2022-05-07T16:00:00+5:302022-05-07T16:00:02+5:30
चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
पिंपरी : शेअर मार्केट कंपनी असल्याचे भासवून साडेसात लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. ५) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.प्रकाश रंगराव पाटील (वय ४९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांची शेअर मार्केट कंपनी आहे, असे भासवले. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना फसवणुकीचा इराद्याने पैसे देण्यास भाग पाडले. स्टेडी ॲपवर फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांची सात लाख ५५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून चांगला फायदा करून देऊ, या अमिषाने अऩेक ठिकाणी फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे याबद्दल काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.