कंपनीचा डेटा विकून कोट्यावधीची फसवणूक; कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

By रोशन मोरे | Published: April 11, 2023 04:46 PM2023-04-11T16:46:40+5:302023-04-11T16:47:10+5:30

कंपनीच्या मुख्य ऑफीसमधील डाटा चोरून तसेच चुकीचा डाटा तयार करून व्यावसायिक स्पर्धकांना देत कंपनीची फसवणूक

Fraud of billions by selling company data A case has been filed against the employees | कंपनीचा डेटा विकून कोट्यावधीची फसवणूक; कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

कंपनीचा डेटा विकून कोट्यावधीची फसवणूक; कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : कंपनीची गोपनीय माहिती तसेच कंपनीचा डाटा स्पर्धक कंपन्यांना दिली. तसेच कंपनीच्या साहित्यात बिघाड करून तब्बल दीड कोटीची फसवणूक केली. ही घटना सन २०१७ पासून ९ एप्रिल २०२३ . या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने तसेच सांगवी येथील ऑफीसमध्ये घडली. या प्रकरणी मुकेश गोपाळ शर्मा (वय ५०, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रविंद्र शंकर जाधव (रा. पिंपळे गुरव), अभिषेक संजय जोशी (रा.औरंगाबाद), जयंत सुरेंद्र त्रेहान (रा.चंदीगढ), इंद्रजित लाल सिंग (रा. चंदीगढ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कंपनीत काम करत असताना त्यांनी एकत्र येत कंपनीचे आर्थिक नुकसान करण्यासाठी कट रचना. तसेच कंपनीकडून प्रात्यक्षिक देण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यामध्ये बिघाड करून कंपनीचे दीड कोटीचे नुकसान केले. तसेच आरोपी इंद्रजित लाल याने सांगवी येथील कंपनीच्या ऑफीसमधील साहित्य जाताना चोरून नेले. तसेच आरोपी यांनी कंपनीने कामासाठी दिलेले लॅपटॉप, मोबाईल, सिमकार्ड , ईमेल्स कंपनीचे काम सोडून जाताना जमा न करता त्याचा बेकायदेशीर वापर केला. तसेच कंपनीचा डाटा चोरून डाटा व्यावसायिक स्पर्धेक कंपन्यांना देवून करोडो रुपयांचे टेंडरिंगमध्ये आर्थिक नुकसान केले आहे. तसेच कंपनीची वेबसाईट जाणीवपूर्वक बंद पाडून कंपनी बंद झाल्याचे कंपनीच्या कंपनीच्या कस्टमरला चुकीची माहिती देत अपप्रचार केला. तसेच कंपनीच्या मुख्य ऑफीसमधील डाटा चोरून तसेच चुकीचा डाटा तयार करून व्यावसायिक स्पर्धकांना देऊन फिर्यादीच्या कंपनीची फसवणूक करत आर्थिक नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Fraud of billions by selling company data A case has been filed against the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.