महागड्या मोटारी विक्रीच्या बहाण्याने पावणे चार कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 07:09 PM2019-02-10T19:09:46+5:302019-02-10T19:11:08+5:30
महागड्या आलिशान वापरलेल्या (सेकंड हँड) मोटारी विकून देतो असे सांगून एका भामट्याने व्यावसायिकाला तब्बल ३ कोटी ८० लाखाना गंडा घातला.
पिंपरी : महागड्या आलिशान वापरलेल्या (सेकंड हँड) मोटारी विकून देतो असे सांगून एका भामट्याने व्यावसायिकाला तब्बल ३ कोटी ८० लाखाना गंडा घातला. याप्रकरणी शनिवारी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनय विवेक आरान्हा (वय ४५, रा. २३ अ, नेपीयर रोड, कॅम्प, पुणे) यानी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर मारुती सुर्यवंशी (वय ३८, कोरेगाव पार्क, पुणे) या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसकणुकीचा हा प्रकार २०१५ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पिंपरी येथे घडला आहे. फिर्यादी विनय आरान्हा यांच्याकडे वापरलेली फॉरच्युनर, बॅन्टली, मरसर्डिज आणि बीएमडब्ल्यु अशा ३ कोटी ८० लाखांच्या चार मोटारी होत्या. २०१५ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आरोपी सागर याने त्यांना मोटारी विक्री करून देतो, असे सांगून चारही मोटारी नेल्या. मात्र त्या मोटारीचे पैसे दिले नाहीत. तसेच मोटारी परत केल्या नाहीत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निकम अधिक तपास करत आहेत.