मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 11:08 AM2021-01-28T11:08:47+5:302021-01-28T11:09:11+5:30

याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

Fraud of Rs 22 crore of Nagar Urban Bank by submitting fake assessment of income | मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक

मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन बँकेची २२ कोटींची फसवणूक

Next

पिंपरी : कर्ज प्रकरणात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या चिंचवड शाखेची २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान पावर हाऊस चौक, चिंचवडगाव येथील नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या शाखेत हा प्रकार घडला.

याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बॅंकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बॅकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (वय ५६, रा. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मे. नेश लीब टेक्‍नोरिअल आणि मे. इंडियन इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज पुणे या कंपनीच्या कर्जदार आरोपी यांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी कर्ज प्रकरणामध्ये तारण गहाण मिळकतीचे बनावट मूल्यांकन अहवाल देऊन व तो स्वीकारून बॅंकेची २२ कोटी रुपयांची फसवणूक केली.

Web Title: Fraud of Rs 22 crore of Nagar Urban Bank by submitting fake assessment of income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.