एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने २४ लाख ९१ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 05:47 PM2021-01-30T17:47:57+5:302021-01-30T17:48:10+5:30
टीव्हीएस कंपनीच्या नटबोल्टची एजन्सी मिळवून देतो, असे सांगत आरोपीने फिर्यादीला गंडवले.
पिंपरी : कंपनीची एजन्सी मिळवून देतो, असे सांगून २४ लाख ९१ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. इंद्रायणीनगर, भोसरी येथे ४ फेब्रुवारी २०१९ ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.
मनोज गजानन माने (वय ५०, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल सुभाषचंद्र मिश्रा (रा. भांडूप, मंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. टीव्हीएस कंपनीच्या नटबोल्टची एजन्सी मिळवून देतो, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्यासाठी व मालासाठी लागणारी रक्कम मला द्या, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने वेगवेगळ्या अकाऊंटवर व रोख स्वरुपात रक्कम दिली. मात्र आरोपीने कसलीही एजन्सी दिली नाही. तसेच अभिनय इंजिनियरिंग वर्क्स या कंपनीची परचेस ऑर्डर देऊन फिर्यादीकडून मटेरियल नेऊन त्याचेही पैसे फिर्यादीला परत न देता फिर्यादी २४ लाख ९१ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली.