दहा कोटींचे कर्ज घेऊन सेवा विकास बँकेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:26 PM2019-02-07T14:26:31+5:302019-02-07T14:28:31+5:30

बॅकेकडून १० कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले.ही रक्कम व्यवसायासाठी न वापरता दुसऱ्याचा कारणासाठी उपयोगात आणली.

fraud with seva vikas Bank from of 10 crores loan | दहा कोटींचे कर्ज घेऊन सेवा विकास बँकेची फसवणूक

दहा कोटींचे कर्ज घेऊन सेवा विकास बँकेची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देवादातील मिळकत ठेवली तारण ; कर्ज रकमेचा अपहार 

पिंपरी: व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता आहे, असे भासवून वादातील मिळकत बँकेकडे तारण ठेवली. बॅकेकडून १० कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले.ही रक्कम व्यवसायासाठी न वापरता दुसऱ्याचा कारणासाठी उपयोगात आणली.बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी आरोपीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपीविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू सेवाराम तनवानी यांनी फसवणूक प्रकरणी आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. सागर सुर्यवंशी तसेच शितल तेजवानी- सुर्यवंशी (रा. कोरेगाव पार्क) अशी आरोपींची नावे आहेत. सागर आणि शितल  हे दोघे मेसर्स रेणुका लॉन्सचे भागीदार होते. त्यांनी फियार्दीचा विश्वास संपादन केले. या दोघांनी सेवा विकास बॅकेकडून कर्ज घेतले. वाकड येथील सर्व्हे क्रमांक १५३/१ ए मधील ३० आर मिळकत निर्विवाद आहे, असे भासवुन बँकेकडे गहाण ठेवली. या मिळकतीचे कागदपत्र सादर करून कर्ज रक्कम घेतली. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम प्रत्यक्षात व्यवसायासाठी न वापरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Web Title: fraud with seva vikas Bank from of 10 crores loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.