Iphone डिस्काउंटमध्ये देण्याच्या बहाण्याने फसवणूक; महिलेचे ५५ हजार लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 11:50 AM2022-07-06T11:50:42+5:302022-07-06T11:50:50+5:30

मी ॲपल कंपनीत सेल्समन म्हणून कामाला आहे, असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला

Fraud under the pretext of giving in iPhone discounts; 55,000 looted from women | Iphone डिस्काउंटमध्ये देण्याच्या बहाण्याने फसवणूक; महिलेचे ५५ हजार लुटले

Iphone डिस्काउंटमध्ये देण्याच्या बहाण्याने फसवणूक; महिलेचे ५५ हजार लुटले

Next

पिंपरी : वधू-वर सूचक मंडळाच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर बायोडेटा शेअर केल्यानंतर महिलेची एकासोबत ओळख झाली. त्याने आयफोन डिस्काउंटमध्ये देण्याचे सांगून महिलेची ५५ हजारांची फसवणूक केली. हिंजवडी परिसरात २४ ते ३० एप्रिल या कालावधीत ही घटना घडली.

वेदांतसिंग नवीनसिंग असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फसवणूक झालेल्या महिलेने याप्रकरणी सोमवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने वधू-वर सूचक मंडळाच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर बायोडेटा शेअर केला होता. त्यावरून फिर्यादीची आरोपीसोबत ओळख झाली. मी ॲपल कंपनीत सेल्समन म्हणून कामाला आहे, असे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. ॲपल कंपनीचा आयफोन ५० टक्के डिस्काउंटमध्ये देतो, असे सांगून आरोपीने फिर्यादीकडून ५५ हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. पैसे घेऊन फोन न देता फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Fraud under the pretext of giving in iPhone discounts; 55,000 looted from women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.