खोटी माहिती देऊन लग्न करून महिलेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 04:04 PM2019-12-20T16:04:49+5:302019-12-20T16:05:48+5:30
पहिली पत्नी मयत असल्याचे सांगून, तिच्यापासून एक मुलगा व एक मुलगी असल्याची माहिती लपवली
पिंपरी : पहिली पत्नी मयत असल्याचे सांगून, तिच्यापासून एक मुलगा व एक मुलगी असल्याची माहिती लपवून ठेवली. त्यानंतर महिलेशी लग्न करून तिची फसवणूक केली. 21 एप्रिल 2019 ते 19 डिसेबर दरम्यान वेळोवेळी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेचा पती रमेश चव्हाण व सासू जनाबाई नामदेव चव्हाण (रा. घनसोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेला वारंवार शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. पहिली पत्नी मयत असल्याचे आरोपीने सांगितले. मात्र पहिल्या पत्नीचे व त्याचे एक मुलगा व एक मुलगी असल्याची माहिती लपवून ठेवली. नंतर त्याला एड्स असल्याचे खोटे सांगून फिर्यादी महिलेशी लग्न केले. तसेच आईचे केअरटेकर असल्याचे खोटे स्टॅम्प पेपर बनवून महिलेची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.