स्पाइन रस्त्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:21 AM2018-08-29T01:21:12+5:302018-08-29T01:21:35+5:30

बाधितांना भूखंडवाटप : मुंबई व नाशिक महामार्ग जोडण्यात येणार

Free the path of Spine Road | स्पाइन रस्त्याचा मार्ग मोकळा

स्पाइन रस्त्याचा मार्ग मोकळा

googlenewsNext

पिंपरी : पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रस्ता उभारला आहे. त्यामुळे त्रिवेणीनगर येथील नागरिकांच्या मिळकती बाधित झाल्या आहेत. त्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला होता. त्यामुळे रस्त्याचे कामही रखडले होते. मात्र, यावर तोडगा निघाला असून, स्पाइन रस्त्यामुळे बाधित झालेल्या ७८ नागरिकांना पहिल्या टप्प्यात भूखंड मिळाला आहे. त्यामुळे स्पाईन रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कृष्णानगर येथील क्रीडा संकुलात महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत ड्रॉ काढून भूखंड सोडत झाली. महापालिकेने या जागेसाठी प्राधिकरणाकडे १६ कोटी ५२ लाख रुपये अगोदरच भरले आहेत. स्पाईन रस्त्यामध्ये ७८ नागरिकांची साठ मीटर जागा बाधित झाली होती, तर १२८ मिळकतधारकांची ७५ मीटर जागा बाधित झाली आहे. या नागरिकांना मोबदला देण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी प्रयत्न केले होते. प्राधिकरणाने बाधितांच्या पुनर्वसनासाठी सेक्टर दोनमध्ये प्लॉट आरक्षित केला होता. प्राधिकरणाने पाचशे, सातशे आणि एक हजार चौरस फुटांनी बाधित नागरिकांना जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्याला आमदार महेश लांडगे यांनी आक्षेप घेतला. एवढ्या जागेत घर बांधणे शक्य आहे का, असा सवाल उपस्थित केला होता. त्यांनी प्रत्येक बाधिताला साडेबाराशे चौरस फूट जागा देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्राधिकरणाने सेक्टर नंबर अकरामध्ये प्लॉट मंजूर केला होता. त्यामुळे तळवडे, त्रिवेणीनगरमधील बाधितांना भूखंडाचे वाटप करण्याचे निर्देशही मिळाले होते. त्यानुसार आज ड्रॉ काढून भूखंडाचे वाटप केले. या नागरिकांना दोन ते तीन महिन्यांत भूखंडाचा ताबा मिळणार आहे.

उर्वरित बाधित नागरिकांना देखील लवकरच भूखंडाचे वाटप
केले जाणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती संजय नेवाळे, नगरसदस्या योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त मंगेश चितळे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, उपअभियंता अशोक अडसूळ, कनिष्ठ अभियंता सुदाम कुºहाडे या वेळी उपस्थित होते.

उर्वरितांना लवकरच जागावाटप
४स्पाइन रस्त्यामुळे त्रिवेणीनगरमधील अनेक मिळकतधारक बाधित झाले होते. नागरिकांना भूखंड मिळण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. प्राधिकरणाने प्रथम पाचशे ते हजार चौरस फुटाने जागा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, साडेबाराशे चौरस फुटाने जागा मिळावी, अशी मागणी केली होती. बाधितांना जागा मिळाली आहे. उर्वरित बाधित नागरिकांना लवकरच भूखंडाचे वाटप केले जाईल, असे लांडगे यांनी सांगितले.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘‘अनेक वर्षांपासून स्पाईन रस्त्याचे काम रखडले होते. मात्र, तोडगा निघाल्याने बाधितांना जागांचे वाटप करण्यात आले. - राहुल जाधव, महापौर

पालिकेचे भूमी व जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, ‘‘स्पाइन रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यातील साठ मीटर रस्त्याने बाधित झालेल्या नागरिकांना भूखंडाचे वाटप केले. त्यासाठी प्राधिकरणाकडून मंजूर झालेल्या पेठ क्रमांक ११मध्ये साडेबाराशे चौरस फुटाने बाधितांना जागेचे वाटप करण्यात आले.
- मंगेश चितळे, सहायक आयुक्त, भूमी व जिंदगी विभाग

Web Title: Free the path of Spine Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.