बीआरटीवर मोफत प्रवास

By admin | Published: August 8, 2015 12:35 AM2015-08-08T00:35:12+5:302015-08-08T00:35:12+5:30

महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संमगवाडी ते विश्रांतवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रावेत ते औंध या दोन मार्गावरील

Free Travel at BRT | बीआरटीवर मोफत प्रवास

बीआरटीवर मोफत प्रवास

Next

पुणे : महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संमगवाडी ते विश्रांतवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रावेत ते औंध या दोन मार्गावरील बीआरटीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गांचा वापर दोन्ही महापालिकांमधील जास्तीत जास्त नागरिकांनी करावा, यासाठी काही मार्गांवर उद्घाटनानंतर एक महिना मोफत बस प्रवासाची सुविधा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मिळणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळाच्या तातडीने झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णयघेण्यात आला असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, येत्या दहा दिवसांमध्ये बीआरटी मार्गाचे उद्घाटन अपेक्षित असून बीआरटीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.
केंद्रशासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुर्ननिर्माण योजनेअंतर्गत आळंदी आणि नगर रस्त्यावर एकूण सोळा किलोमीटर लांबीचा बीआरटी मार्ग विकसीत करण्यात आला आहे. त्यापैकी आळंदी रस्त्यावरील संगमवाडी ते विश्रांतवाडी हा कॉरिडॉर येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. या मार्गांसाठीच्या बस, ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती, चालक-वाहकांचे प्रशिक्षण, आयटीएमएस यंत्रणा आदीबाबतची कायर्वाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्ग सुरु करण्यासंदर्भात संचालक मंडळाची तातडीची सभा शुक्रवारी झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा अश्?विनी कदम, अभिषेख कृष्णा, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, राजीव जाधव, जितेंद्र पाटील उपस्थित होते.
दरम्यान, बीआरटी बसची प्राथमिक चाचणी सध्या सुरू आहे. आयुक्त राजीव जाधव यांनी सांगवी-किवळे मार्गाची पाहणी केली. तसेच, बसमध्ये बसून प्रवास केला. आयुक्तांनी विद्युत, उद्यान विभागाच्या कामांची पाहणी केली. बसथांबा, पथदिवे, गतिरोधक, सिग्नल यंत्रणेची पाहणी करण्यात आली. तसेच, आयुक्तांनी काही ठिकाणी सुरू असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Free Travel at BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.