पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 05:42 PM2018-11-28T17:42:02+5:302018-11-28T17:42:35+5:30

पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक येथे काम सुरू आहे.

Free the work of Jagtap Dairy Road at Pimpalegurav | पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा 

पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा 

googlenewsNext
ठळक मुद्देलष्कराला महापालिका देणार पावणे तीन कोटी; स्थायीची मंजुरी 

पिंपरी : पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक ते पिंपळे सौदागर शिवार चौक येथील रस्त्याच्या ४५ मीटर रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. जागेच्या मोबदल्यात संरक्षण विभागाने मागणी केलेला दोन कोटी ६५ लाख ४८ हजार ३५१ रूपयांचा निधी देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.  
महापालिकेची स्थायी सभा झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस स्थापत्य विभागाच्या वतीने शहरातील काही मार्गावर रूंदीकरणाचे कामे सुरू आहेत. त्यापैकी पिंपळेगुरव येथील जगताप डेअरी चौक येथे काम सुरू आहे. त्या अंतर्गत जगताप डेअरी चौक ते शिवार चौक या दरम्यानच्या ४५ मीटर रस्त्याच्या दक्षिणेकडील संरक्षण विभागाची सीमाभिंत आहे. त्याला लागून स्ट्रॉम वॉटर वाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, हे काम संरक्षण विभागामार्फत थांबविण्यात आले होते. याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तसेच पालिकेच्या अधिकाºयांनी औंधच्या ३३० इन्फ्रन्टी बिग्रेडचे कॅप्टन दिलीप शेखर यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यांनी आर-९ रस्त्यासंदर्भात उर्वरित २ कोटी ६५ लाख ४८ हजार ३५१ रुपये संरक्षण विभागास अदा करण्याचा सूचना केल्या. पैसे अदा केल्यानंतरच या जागी काम करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या जागेसाठी चार कोटी चाळीस लाख ६२ हजार ३५१ रूपयांची मागणी संरक्षण विभागाने केली होती. पालिकेने आतापर्यंत १ कोटी ७५ लाख १४ रूपयांची रक्कम संरक्षण विभागास अदा केली आहे. 
याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. व संबंधित कामाची रक्कम तातडीने देण्याचा विषय मंजूर केला. थांबलेले काम सुरू करण्यासाठी उर्वरित २ कोटी ६५ लाख ४८ हजार ३५१ रुपये संरक्षण विभागास देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Free the work of Jagtap Dairy Road at Pimpalegurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.