भंगार विक्रीतून मिळालेल्या ७०० रुपयांच्या वाटपावरून मित्राचा खून, दोघांना ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Published: June 18, 2023 06:03 PM2023-06-18T18:03:11+5:302023-06-18T18:03:48+5:30

मिळालेले ७०० रुपये आपसात वाटून घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि तिघांनी मिळून एकाचा खून केला

Friend's murder over distribution of Rs 700 received from scrap sale | भंगार विक्रीतून मिळालेल्या ७०० रुपयांच्या वाटपावरून मित्राचा खून, दोघांना ठोकल्या बेड्या

भंगार विक्रीतून मिळालेल्या ७०० रुपयांच्या वाटपावरून मित्राचा खून, दोघांना ठोकल्या बेड्या

googlenewsNext

पिंपरी : भंगार विक्रीतून मिळालेल्या ७०० रुपयांच्या वाटणीवरून मित्रांमध्ये वाद झाला. यात तिघांनी मिळून एका मित्राला दगडाने ठेचून ठार केले. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे १२ जून रोजी ही घडना उघडकीस आली होती. या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी दोघांना अटक केली. 

रवींद्र सिंह (रा. कुदळवाडी, चिखली) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी जितेंद्रकुमार सुभाष भारद्वाज (वय २८, रा. उत्तर प्रदेश), रवी सुखलाल गींधे (वय २७, रा. यलदरी कॅम्प, ता. जिंतूर, जि. परभणी) यांना अटक केली. त्यांचा साथीदार टिक्या हा फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी मोशी येथील मोकळ्या मैदानात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्हे शाखा युनिट एकच्या दोन पथकांनी याचा समांतर तपास सुरू केला. रवींद्र सिंह याच्या मित्रांनी त्याचा खून केला असून ते कुदळवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुदळवाडी परिसरात सापळा लावून जितेंद्रकुमार आणि रवी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी आणखी एका साथीदारासोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली.

युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक शेख, पोलीस अंमलदार बाळू कोकाटे, मनोजकुमार कमले, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, अजित रूपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, तानाजी पानसरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

भंगार गोळा करून विक्री 

आरोपी आणि रवींद्र सिंह हे फिरस्ती होते. रस्त्यावर दिसलेल्या भंगार वस्तू गोळा करून त्यांची विक्री करून ते पैसे घेत होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यामुळे मोशी परिसरातील काही दुकाने आणि घरांवरील पत्रे उडाले होते. ते पत्रे गोळा करून चौघांनी एका दुकानात विक्री केली. त्यातून मिळालेले ७०० रुपये आपसात वाटून घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यात तिघांनी मिळून रवींद्र याचा दगडाने ठेचून खून केला.

Web Title: Friend's murder over distribution of Rs 700 received from scrap sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.