सुविधेच्या मागणीसाठी मोर्चा
By admin | Published: December 23, 2016 12:33 AM2016-12-23T00:33:15+5:302016-12-23T00:33:15+5:30
पिंपळे निलख-विशालनगर भागात पायाभूत आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, याकडे महापालिका
वाकड : पिंपळे निलख-विशालनगर भागात पायाभूत आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, याकडे महापालिका प्रशासनाला गांभीर्य नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढला.
तसेच गेल्या पाच वर्षांत पिंपळे निलख भागात पायाभूत सुविधा आणि मूलभूत नागरी सुविधा देण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून, परिसरातील रस्त्यांवर पथदिवे नाहीत, रस्त्यांचा विकास नाही, सुरळीत पाणी पुरवठा होत नाही, विशालनगरमध्ये बहुतांश नोकरदार वर्ग राहतो. नोकरीवरून रात्री-अपरात्री घरी पोहोचण्यास उशीर होतो. त्यातच पथदिवे बंद असल्याने त्यांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. फुटलेले ड्रेनेजलाइन, घनकचरा संकलन, गटार इत्यादी समस्यांचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे नागरिकांना जगणे असह्य झाले आहे.
नागरिकांना भेडसावत असलेल्या या समस्यांवर महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करीत नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. या वेळी चंद्रकांत खोसे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात कामठे यांच्यासह संदेश इंगवले, संभाजी तांबे, विघ्नेश नाईक, नैना कामठे, प्रगती कामठे, शोभा जगताप, कल्पना सदाकाळ, सुभद्रा वाघमारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली.(वार्ताहर)