राज्यमंत्र्यांसमोर हमरीतुमरी , पिंपरी विधानसभा बैठक, भाजपाच्या शिस्तीला गटबाजीने तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 02:16 AM2017-12-10T02:16:10+5:302017-12-10T03:26:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची महापालिकेतील सत्ता पालटवून सहा महिन्यांपासून कारभार पाहाणाºया भाजपामध्ये शिस्तबद्धतेचे तीनतेरा वाजले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसची पंधरा वर्षांची महापालिकेतील सत्ता पालटवून सहा महिन्यांपासून कारभार पाहाणाºया भाजपामध्ये शिस्तबद्धतेचे तीनतेरा वाजले. पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी असलेले राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पदाधिकारी एकमेकाला भिडले. हमरीतुमरीवर आलेल्या या पदाधिका-यांचा वाद नगरसेवकांनी हस्तक्षेप करीत थांबविला.
महापालिका निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. अन्य पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी मिळाली़ नंतर पदेही मिळाली. ज्येष्ठ कार्यकर्ते मात्र वंचित राहिले. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून आयात केलेल्यांना पदे देऊन सन्मान होतोय. त्यामुळे भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या बैठकीच्या निमित्ताने ही खदखद बाहेर पडली. नितीन गडकरी यांचे समर्थक मानले जाणारे शहर सरचिटणीस प्रमोद निसळ आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे कट्टर समर्थक म्हणून काम केलेले प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यात वादंग झाले. एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत हा वाद वाढला.
महापौरपदासाठी खºया ओबीसींना संधी?
भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे नेहूल कुदळे यांनी महापौर पदावर खºया ओबीसींना संधी द्यावी. आठ महिन्यांचा महापौर पदाचा कालावधी केल्यास इतरांनाही संधी मिळू शकेल. सर्व काही बाहेरून येणाºया आणि बनावट ओबीसींच्या पदरात घालायचे का? असा मुद्दा उपस्थित झाला. त्यातच पक्षात जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना मिळणारी वागणूक हा मुद्दाही चर्चेत आला. पिंपरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष कैलास कुटे यांच्या उपस्थितीत बुथ प्रमुख नेमण्याचा प्रमुख विषय बैठकीत होता. मात्र चर्चा भरकटल्याने हा मुद्दा बाजूला पडला. महापौर पद खºया ओबीसींना देण्याच्या आग्रही मागणीबरोबर बाहेरून पक्षात आलेल्यांनाच पदे मिळतात, पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा विचार होणार की नाही? ही मनातील खदखद कार्यकर्त्यांच्या तोंडून व्यक्त झाली.