कष्टक-यांच्या मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:14 AM2017-08-02T03:14:02+5:302017-08-02T03:14:02+5:30

कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महामोर्चा काढण्यात आला.

Front for ministry's demands | कष्टक-यांच्या मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा

कष्टक-यांच्या मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा

Next

पिंपरी : कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महामोर्चा काढण्यात आला. या वेळी पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, नागपूर, कोल्हापूर सह विविध ठिकाणच्या असंघटित कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. या महामोर्चास सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात अनिल बारवकर, राजू बिराजदार, साईनाथ खंडीझोड, इरफान चौधरी, सुरेश देंडे, दीपक पाचपुते, गणेश शिंदे, ज्ञानदेव लगाडे, इरफान मुल्ला, नागनाथ लोंढे, शशिकला ढवळे, जयश्री निरवने, पार्वती शिंदे, अरुणा सुतार, सरिता वाढोरे, मीना जाधव, राजू हाके, कासीम तांबोळी, उमेश डोर्ले, अनिलमुकी, शेषनारायण खंकाळ, संजय यवलेकर, हणमंत चाल्लावर, नारायण कलाल, सय्यद आली, विजय सूर्याशी नदीम पठाण, पोपट सकट, विनोद मोरया, ओमप्रकाश मौर्या, लक्ष्मण कोरे, सखाराम केदार आदी उपस्थित होते.
सामाजिक सुरक्षा लागू करा, म्हातारपणी पेन्शन लागू करा, पथ विक्रेता कायद्याची राज्यात सक्षम अंमलबजावणी करा, सामान्यांची अनधिकृत घरे नियमित करा, सर्व शासकीय जागांवरील झोपडीधारकांचे सरसकट सर्वेक्षण करून पक्की घरे द्या आदी मागण्यांकडे घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधले. पुढे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष, आमदार कपिल पाटील, आमदार विद्या चव्हाण, आमदार हरिभाऊ राठोड यांनी सभेला संबोधित करत आपला पाठिंबा दिला. नगरविकास मंत्री रणजित पाटील, यांच्याशी शिष्ठमंडळाने निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी त्यांनी सध्याचे सरकार सामान्य व गरिबांसाठी असून बांधकामे नियमितिकरण, झोपडीधारकांना घरे व फेरीवाला कायद्याबाबत शासन सकारात्मक आणि चांगले निर्णय लवकरच घेणार आहे. वरील विषयाबाबत
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Front for ministry's demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.