राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:40 AM2017-10-06T06:40:32+5:302017-10-06T06:40:44+5:30
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांची सरसकट कर्जमाफीची शंभर टक्के अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. शेतकºयांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा. कृषी मालाची खरेदी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच रब्बी हंगामासाठी शेतकºयांना पीककर्ज तातडीने देण्यात यावे़, आदी मागण्या या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
पोटोबामहाराज मंदिरापासून सुरुवात झालेल्या मोर्चाला पंचायत समिती चौकामध्ये सभेचे स्वरूप आले़ यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेना सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांत राज्यांमधल्या शेतकºयांच्या प्रश्नावर प्रचंड आंदोलने होऊनसुद्धा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या सरकारने याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत़ राज्यात पंधरा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याने महाराष्ट्र हे सर्वाधिक आत्महत्या केलेले राज्य, अशी बदनामी आपल्या राज्याच्या वाटेला आलेली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. शेतकºयांनी कर्जमाफी जाहीर केली ही कर्जमाफी ऐतिहासिक असून देशातील सर्वांत मोठी माफी आहे, असा ढोल बडवला. परंतु प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी होणे अत्यंत कठीण होऊन बसले़ या बोलघेवड्या सरकारला हुसकावून लावण्याची वेळ आता आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, सुरेश धोत्रे, किशोर भेगडे, गणेश काकडे, शोभा कदम, शुभांगी राक्षे, साहेबराव कारके, दत्ता शेवाळे, विक्रम कदम, सुनील ढोरे, सचिन घोटकुले, रूपाली दाभाडे आदी उपस्थित होते़