पाच लाखांचे दागिने गहाण ठेवून घेऊन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 04:37 PM2019-12-20T16:37:08+5:302019-12-20T16:37:45+5:30
विश्वास संपादन करून दागिने गहाण घेतले ठेवून
पिंपरी : विश्वास संपादन करून दागिने गहाण ठेवून घेतले. त्याबदल्यात पैसे देण्याचे सांगितले. मात्र पैसे तसेच घेऊन गेलेले चार लाख 94 हजारांचे दागिने परत न करता फसवणूक केली. सूसगाव येथे 2 ऑगस्ट 2018 रोजी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी इंद्राणी राजू जगताप (वय 39, रा. तापकीर वस्ती, सुसगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोमा सिंग (रा. सूसगाव) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रोमा हिने फिर्यादी इंद्राणी यांचा विश्वास संपादन केला. चार लाख 94 हजारांचे 130 ग्रॅम वजनाचे दागिने गहाण ठेवून पैसे मिळवून देते, असे सांगून दागिने घेऊन गेली. मात्र पैसे किंवा दागिने परत न करता फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.