अकरावी प्रवेश : बावीस हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:26 AM2018-07-10T02:26:20+5:302018-07-10T02:26:31+5:30

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

FYJC Admission : Twenty-two thousand students refuse admission | अकरावी प्रवेश : बावीस हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार

अकरावी प्रवेश : बावीस हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार

Next

पुणे  - अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरीत केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेतले.
अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, त्यापैकी ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी दिलेल्या १० पसंती क्रमानुसार महाविद्यालय मिळाले होते. मात्र या ४१ हजार ९६१ विद्यार्थ्यांपैकी केवळ १७ हजार २११ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. बायफोकलच्या २ हजार ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांना मात्र मिळालेले महाविद्यालय पसंत नसल्याने त्यांनी प्रवेश घेतलेला नाही. दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. पहिल्या फेरीतील महाविद्यालयांचे कटआॅफ १० जुलैनंतर जाहीर
करण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलात येतील. दुसºया फेरीची गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार १८९ इतकी आहे. या १७ हजार १८९ विद्यार्थ्यांना सोमवारी प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्यांना प्रवेशाच्या सर्व फेºया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे.
केंद्रीय आॅनलाइन प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य २ ते १० पर्यंतच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्यास त्यांना प्रवेशासाठी पुढील फेºयांमध्ये संधी उपलब्ध असणार आहे. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन रद्द केल्यास त्या विद्यार्थ्यांना ब्लॉक केले जाणार आहे.

प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढ
अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी मंगळवार, दि. १० जुल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे काही कारणास्तव ज्यांना प्रवेश घेता आला नाही त्यांना मंगळवारी आणखी एक संधी आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांचा अर्ज प्रवेश प्रक्रियेतून बाद केला जाणार आहे.
 

Web Title: FYJC Admission : Twenty-two thousand students refuse admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.