Gaja Marne | कोथरूडमधील गुंड गजा मारणेला विशेष न्यायालयाकडून जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:19 PM2023-04-03T19:19:42+5:302023-04-03T19:21:38+5:30

२० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड गजानन उर्फ गजा मारणेला जामीन...

Gaja Marne news Bail by special court for Kothrud gangster ransom crime news | Gaja Marne | कोथरूडमधील गुंड गजा मारणेला विशेष न्यायालयाकडून जामीन

Gaja Marne | कोथरूडमधील गुंड गजा मारणेला विशेष न्यायालयाकडून जामीन

googlenewsNext

पुणे : व्यावसायिकाकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सोमवारी जामीन मंजूर केला.

दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गजा मारणे याच्यासह साथीदारांना खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती. यात मारणे याच्यासह १८ साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासात मारणे याचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करणारा कोणताही मौखिक, तांत्रिक अथवा अन्य सबळ पुरावा उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेले नाही, असा उल्लेख तपास अधिकारी सतीश गोवेकर यांनी न्यायालयात सादर केला आहे.

मारणे याच्याविरुद्ध ठोस पुरावे नाहीत. खंडणी प्रकरणाशी प्रत्यक्ष त्याचा संबंध नाही. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती मारणे याचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवादात केली. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मारणे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

मारणे याची कोथरूड परिसरात दहशत असून, त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून प्रकरणात न्यायालयाने मारणे याची जामिनावर मुक्तता केली होती. त्यावेळी मारणे याच्या साथीदारांनी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून मोटारीतून फेरी काढली. तळोजा कारागृह ते कोथरूडपर्यंत काढलेल्या या फेरीत ३०० ते ४०० मोटारी होत्या. द्रुतगती मार्गावर मारणे टोळीतील सराईतांनी दहशत माजविली होती. याबाबतची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी मारणे आणि साथीदारांविरुद्ध कोथरूड, खालापूर, शिरगाव पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले होते.

Web Title: Gaja Marne news Bail by special court for Kothrud gangster ransom crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.