आकड्याच्या चक्रव्यूहात जुगारी पोहचला ‘आयसीयू’त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 03:26 PM2020-01-17T15:26:35+5:302020-01-17T15:27:06+5:30

संसाराची राखरांगोळी : पत्नी अन् मुलांना पोरके होण्याची भीती

The gambler reached the 'ICU' in the ring of numbers | आकड्याच्या चक्रव्यूहात जुगारी पोहचला ‘आयसीयू’त

आकड्याच्या चक्रव्यूहात जुगारी पोहचला ‘आयसीयू’त

Next
ठळक मुद्देलोकमतने पिंपरी-चिंचवड होतेय अवैध धंद्यांचे आगार अशी वृत्तमालिका केली प्रसिद्ध

पिंपरी : मटक्याच्या आकडेवारीचे गणित जुळवता-जुळवता संसाराचे समीकरण चुकत गेले. कष्टाने कमावलेला जुगारापाई सर्व काही मातीमोल झाले. आकड्यांच्या व्यसनाने पतीने संसाराचा राखरांगोळी करीत सर्वस्व गमावले, अशी व्यथा एका महिलेने ‘लोकमत’कडे मांडली. त्यांच्या पतीचा भाजीपाला व्यवसाय ते थेट ‘आयसीयू’मध्ये दाखल, असा हृदयद्रावक शेवटचा प्रवास सुरू आहे.
लोकमतने पिंपरी-चिंचवड होतेय अवैध धंद्यांचे आगार अशी वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये जुगार अन् मटक्याच्या नादाने अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याचे वास्तवही मांडले. त्यानंतर एक महिलेने लोकमतच्या कार्यालयात फोन करून मला माझी व्यथा मांडायची आहे, असे सांगितले. ही व्यथा आहे ताथवडे परिसरात राहणा-या लक्ष्मीबाई (नाव बदलले आहे) यांची. 
भाजीपाल्याची विक्री करून सुखाने संसार सुरू होता.  मित्रांच्या नादाला लागून २१ व्या वर्षांपासूनच पती बाळासाहेबांना मटक्याची चटक लागली. तुझे आकडे बरोबर येतात, असे सांगून मित्रांच्या नादाने त्यांना आकड्याचे व्यसन लागले. एकीकडे वय वाढत असतानाच त्यांच्या आकडा लावण्याच्या रकमाही वाढत गेल्या. तशी कुटुंबाला देखील उतरती कळा लागली. नाद सुटने म्हणून संसाराचा गाडा मी कष्टाने ओढू लागले. केवळ मला साथ द्या, कोणाच्याही नादाला लागू नका, मुले मोठी होताहेत. त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, असे  सांगण्याचा प्रयत्न केला.  तरीही  मटक्याची आकडेमोड करीत त्यांनी  मुला बाळांची अभाळ तर केलीच, सारा संसार उद्ध्वस्थ करून टाकला.  
एवढेच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून मुलाच्या लग्नासाठी जमा केलेली व घरात जपून ठेवलेली ३ लाख रुपयांची रक्कम आकड्याच्यादोन दिवसांत उडविली. तिस-या दिवशी भानावार आल्यावर कळले की आपण आकड्यांच्या धुंदीत मुलाच्या लग्नासाठी जमविलेला पैसाही उडविला.  या मानसिक झटक्यातून ते सावरू शकले नाहीत. त्यांना मानसिक धक्कयाबरोबर चार दिवसांपूर्वी हृदय विकाराचा झटका आला. आज ते मृत्यूूूच्या दाढेत अडकले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. जुगाराच्या नादात माझ्या संसाराची राखरांगोळी झाली.
........
मटक्याने नेले जीवनमरणाच्या दारात
४पत्नीच्या जीवावर संसार आणि खर्च पाणी सुरू असतानादेखील आकडा मात्र सुटला नाही. बाबासाहेबांनी पै-पै करून घेतलेली जागादेखील विकली अन् भाड्याच्या खोलीत राहावयास गेले. पत्नीकडून पैसे न भेटल्यास कांदे अन् बटाटेच्या गोणी विकून मटका खेळला. अखेर या मटक्याच्या चक्रव्यूहाने बाबासाहेबांना जीवनमरणाच्या दारात उभे केले आहे.

Web Title: The gambler reached the 'ICU' in the ring of numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.