गणेशभक्तांची मांदियाळी
By admin | Published: February 7, 2015 11:49 PM2015-02-07T23:49:08+5:302015-02-07T23:49:08+5:30
संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथील अष्टविनायकांपैकी श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याने थेऊर गावाला जत्रेचे स्वरूप आले होते.
लोणी काळभोर : संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथील अष्टविनायकांपैकी श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याने थेऊर गावाला जत्रेचे स्वरूप आले होते.
शनिवारी पहाटे साडेचार वाजता देवस्थानाचे पुजारी सुधीर आगलावे यांनी ‘श्रीं’ची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. सकाळी सातच्या सुमारास चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे मोरेश्वर पेंडसे यानी पूजा केली. या वेळी व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे उपस्थित होते.
पहाटेच्या वेळी थंडी असल्याने गर्दीचे प्रमाण कमी होते. सकाळी सातनंतर भाविकांचा ओघ वाढला तो दुपारपर्यंत कायम होता. दुपारी चिंचवड देवस्थानाच्या वतीने ६० किलो खिचडी, तर श्री चिंतामणी
सेवा तरुण मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी १७५ किलो उपवासाच्या चिवड्याचे वाटप केले.
(वार्ताहर)
४दुपारी चारनंतर गर्दी वाढली. ती चंद्रोदयापर्यंत कायम होती. मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा फळे, भाजी तसेच नारळ व फूल विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे
त्याचा त्रास भाविकांना झाला. चंद्रोदय झाल्यानंतर ‘श्रीं’चा छबिना काढण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
सकाळी गर्दीचा ओघ
४सकाळी गर्दीचा ओघ कमीच जाणवला. मात्र, दुपारी बाजारपेठेपर्यंत रांगा
लागल्या होत्या.
४रात्री मयूरेश्वराची चंद्रोदयाच्या वेळी आरती झाली. या
वेळी असंख्य भाविक उपस्थित होते.