Medicine Fraud! पिंपरीत म्युकरमायकोसिसच्या औषधांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:57 PM2021-06-17T18:57:27+5:302021-06-17T18:57:38+5:30

वाकड पोलिसांनी केली दोन आरोपींना अटक, त्यांच्याकडून एक लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

A gang Fraud mucormycosis Medicines in Pimpri-Chinchwad | Medicine Fraud! पिंपरीत म्युकरमायकोसिसच्या औषधांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Medicine Fraud! पिंपरीत म्युकरमायकोसिसच्या औषधांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext
ठळक मुद्देएक जण गुलबर्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, गुलबर्गा या शासकीय रुग्णालयात कोविड तसेच म्युकरमायकोसिस विभागात नर्सिंग स्टाफ असल्याने आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू

पिंपरी : अँटी फंगल अर्थात म्युकरमायकोसिस या आजारावरील औषधांचा काळा बाजार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून एकूण एक लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरुवातीला पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने यातील काही आरोपींना अटक केली होती.

शरणबसवेश्वर सिद्धेश्वर ढमामे (वय ३८, रा. विजापूर रोड, सोलापूर), राजशेखर कासाप्पा भजंत्री (वय ३३, रा. गुलबर्गा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुरुवातीला पाच जणांना अटक केली होती. त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून ढमामे याचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले.  त्याला सोलापूर येथून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता औषधांचा अवैध पुरवठा गुलबर्गा येथून होत असल्याचे समोर आले. पोलिसांनी गुलबर्गा येथे सापळा लावून भजंत्री याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून औषंधांचा साठा जप्त करण्यात आला.

भजंत्री हा गुलबर्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, गुलबर्गा या शासकीय रुग्णालयात कोविड तसेच म्युकरमायकोसिस विभागात नर्सिंग स्टाफ आहे. त्यामुळे या प्रकरणात मेडिकल कॉलेजमधील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे. तसेच आरोपींनी सोलापूर येथे देखील काही औषधे विकली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने तपास करत आहेत.

Web Title: A gang Fraud mucormycosis Medicines in Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.