अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; देहूरोड परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 02:45 PM2021-06-03T14:45:52+5:302021-06-03T15:03:39+5:30
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला
पिंपरी : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी चार आरोपींना देहूरोडपोलिसांनीअटक केली आहे. देहूरोड परिसरात जानेवारी २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
नोमान उर्फ आरबाज जावेद खान (वय १९, रा. मामुर्डी, देहूरोड), सुलतान उर्फ मुश्ताक सलीम सय्यद (वय ३२), रियाज ऊर्फ मन्नन जावेद खान (वय १९), सोहेल शेरअली पिरजादे (वय २१, रा. आंबेडकर नगर, मामुर्डी, देहूरोड), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह बिट्टू उर्फ हमीद जावेद खान तसेच झायेद उर्फ राॅयल निंजा उर्फ सोन्या रशीद खान यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणीने बुधवारी (दि. २) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुश्ताक सय्यद याने फिर्यादी तरुणी व आरोपी आरबाज खान यांचा शारीरिक संबंधांचा व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी मुश्ताक सय्यद याने फिर्यादी तरुणीवर बलात्कार केला. इतर आरोपींनी देखील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच वेळोवेळी जबरदस्तीने फिर्यादी तरुणीवर बलात्कार तसेच अनैसर्गिक शारीरिक संबंध केले.
आरोपी आरबाज खान याने फिर्यादी तरुणीला मारहाण केली. तिला व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून अनैसर्गिक कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील तपास करीत आहेत.