बसप्रवासात गोंधळ करून लुटमार करणारी महिलांची टोळी गजाआड; हिंजवडी पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 09:20 PM2020-12-15T21:20:50+5:302020-12-15T21:21:21+5:30

आरोपी महिला मुळच्या सोलापूर येथील असून, मुंबई - बेंगळुरू महामार्गावर लुटमार करीत असल्याचे तपासात निष्पन्न

A gang of women who theft a bus during a commotion; Hinjewadi police action | बसप्रवासात गोंधळ करून लुटमार करणारी महिलांची टोळी गजाआड; हिंजवडी पोलिसांची कारवाई 

बसप्रवासात गोंधळ करून लुटमार करणारी महिलांची टोळी गजाआड; हिंजवडी पोलिसांची कारवाई 

Next
ठळक मुद्दे १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी : बसमध्ये प्रवाशांसोबत वाद घालून गाेंधळ करून लुटमार करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे. याप्रकरणी सात महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी महिला मुळच्या सोलापूर येथील असून, मुंबई - बेंगळुरू महामार्गावर लुटमार करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली. 

अर्चना मनोहर देवकर (वय ३७, रा. घाटकोपर, वेस्ट मुंबई, मूळ रा. किरपे, ता. कराड, जि. सातारा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी या कराड ते मुंबई असा प्रवास करीत होत्या. त्याच बसने आरोपी सात महिला प्रवास करीत होत्या. दरम्यान सुतारवाडी ते राधा चाैक दरम्यान आरोपी सात महिलांनी फिर्यादी यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच आरोपी महिलांनी फिर्यादी यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिने असलेली पर्स, १० हजारांची रोकड, तसेच सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण एक लाख ८३ हजार २०० रुपयांचा ऐवज हिसका मारून जबरदस्तीने घेऊन पळून जात होते. याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर धाव घेत आरोपी महिलांना ताब्यात घेतले.   

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, उपनिरीक्षक नंदराज गभाले, पोलीस कर्मचारी अविनाश सगर, तानाजी टकले, विजय बंजत्री, रेखा धोत्रे, तेजश्री म्हैशाले, भाग्यश्री जमदाडे, पुनम आल्हाट यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

बंगळुरू-मुंबई महामार्गावर लुटमार
आरोपी महिला मूळच्या सोलापूर येथील आहेत. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर लहान मुलांना सोबत घेऊन बसने प्रवास करून दागिने तसेच माैल्यवान ऐवज असलेल्या प्रवासी महिलेशी आरोपी वाद घालत. भांडणादरम्यान गोंधळाचा फायदा घेऊन एक आरोपी महिला दागिने, रोकड, माैल्यवान वस्तूंची चोरी करीत असे. महामार्गावरील कराड, सातारा, चांदणी चाैक, वाकड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा पद्धतीने आरोपींनी बऱ्याच चोरी केल्याची शक्यता आहे.

Web Title: A gang of women who theft a bus during a commotion; Hinjewadi police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.