विकासनगरमध्ये टोळक्याचा धुडगूस

By admin | Published: July 4, 2017 03:40 AM2017-07-04T03:40:12+5:302017-07-04T03:40:12+5:30

विकासनगर-किवळे व शितळानगर परिसरात दहा-बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने रविवारी मध्यरात्री एकावर प्राणघातक हल्ला करीत दत्तनगर

Gangetic haze in Vikasnagar | विकासनगरमध्ये टोळक्याचा धुडगूस

विकासनगरमध्ये टोळक्याचा धुडगूस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : विकासनगर-किवळे व शितळानगर परिसरात दहा-बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने रविवारी मध्यरात्री एकावर प्राणघातक हल्ला करीत दत्तनगर व मुकाई चौक भागातील दहा-बारा वाहनांची, तसेच मुकाई चौकातील छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांची व हातगाड्यांची तोडफोड करून पसार झाले आहेत.दरम्यान, तोडफोड सत्राने परिसरात दहशत पसरली आहे.
नितेश दिलीप गोसावी (वय २५ ,रा.शितळानगर नं. १, देहूरोड) असे गंभीर जखमीचे नाव असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अरूण मुकेश हस्तोडीया, संदेश ऊर्फ दाद्या होळकर, योगेश होळकर, शुभम ऊर्फ छोट्या गोवे, विशाल होळकर, सागर भालेराव त्यांचे ५ ते ६ जण साथीदारांविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितळानगर येथील ओमप्रक्राश प्रोव्हिजन स्टोअर्सजवळ रविवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्यांनी गोसावी याला तू राहुल विश्वकर्मा सोबत का फिरतो, असे टोळक्याने विचारणा करीत तलवार, कोयत्याने दोन्ही पायांवर वार करून बेदम मारहाण केली. रात्र गस्तपथकावरील देहूरोड पोलीस वेळीच पोहोचल्याने टोळके पसार झाले.
सशस्त्र टोळक्याने किवळे, मुकाई चौक,दत्तनगर ,शितळानगर व एम बी कॅम्प परिसरात दहशत पसरवीत ५ ते ६ फास्टफूड दुकाने, हातगाड्यांची तोडफोड करीत परिसरातील ५ मोटार , २ टेम्पो, स्कूल बस आणि ४ मोटरसायकली अशा बारा वाहनांची तोडफोड केली आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून चाललेल्या टोळक्याच्या उच्छादाने देहुरोड पोलिसांची तारांबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी देहूरोड येथील बापदेवनगरजवळील श्रीनगर येथे मध्यरात्री एक दुचाकी जाळण्यात आली होती, तर शनिवारी रात्री मुकाई चौकातील दुकाने व हातगाड्यावाल्यांना टोळक्यांनी सशस्त्र धमकावीत हप्ता वसूल करण्याचा प्रकार घडला होता.
धास्तावलेले संबंधित व्यावसायिकांनी पोलिसांत तक्रार न दिल्याने याप्रकरणी कोणतीही माहिती पोलीस ठाण्यात उपलब्ध नव्हती. देहूरोड, विकासनगर -किवळे व शितळानगर परिसरात गटातटांच्या भांडणामुळे टोळ्या निर्माण होत आहेत.

Web Title: Gangetic haze in Vikasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.