पिंपरी शहरात अज्ञात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड, तीन जणांवर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:49 PM2018-05-16T13:49:01+5:302018-05-16T13:49:01+5:30

पिंपरीत तरुणांवर कोयत्याने वार करतरस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टेम्पो, कार यांसारख्या एकूण १० ते १२ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

gangs attack on vehicles and persons at Pimpri | पिंपरी शहरात अज्ञात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड, तीन जणांवर वार

पिंपरी शहरात अज्ञात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड, तीन जणांवर वार

Next
ठळक मुद्देगुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरशहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या देण्याची मागणी पुन्हा जोर

पिंपरी : शहरात वाहनांच्या काचा तोडफोडीचे सत्र सुरूच असून मंगळवारी रात्री नेहरुनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन इमारत भागात अज्ञात टोळक्याने १५ वाहनांच्या काचा फोडून नुकसान करुन नेहरुनगर भागात तीन जणांवर वार केले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या देण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री  अकराच्या सुमारास दुचाकीवर हातात शस्त्रे घेवून आलेल्या अज्ञात टोळक्यांनी दहशत माजवत गणेश रामदास नेरकर (वय ३२, रा. नेहरू टॉवर, नेहरूनगर पिंपरी) व विठ्ठल नगर झोपडपट्टी पुनर्वसन येथे कामावरून घरी चाललेल्या संभाजी म्हस्के यांच्यावर देखील कोयत्याने वार करत नेहरूनगर चौकात एकाला मारहाण केली. तसेच या परिसरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टेम्पो, कार यांसारख्या एकूण १० ते १२ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोडफडीच्या घटनामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. या घटनेची माहिती कळताच सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, भोसरीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिंगबर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, मधुसूदन घुगे, विठ्ठल बडे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची चौकशी केली. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Web Title: gangs attack on vehicles and persons at Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.