तडीपार गुंडाला वाकड येथुन अटक ; गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 05:30 PM2018-11-25T17:30:44+5:302018-11-25T17:32:03+5:30
भांडणे व मारामाऱ्यांसह अनेक गुन्हे असलेल्या तडीपार गुन्हेगाराला थेरगाव परिसरातून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली.
पिंपरी-चिंचवड (वाकड) : भांडणे व मारामाऱ्यांसह अनेक गुन्हे असलेल्या तडीपार गुन्हेगाराला थेरगाव परिसरातून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली.
संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (वय २५, रा. काळाखडक, झोपडपट्टी) असे त्याचे नाव असून बाळू याच्यावर वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडणे व मारामारीचे गुन्हे असल्याने परिमंडळ दोनच्या उपायुक्तांनी त्यास २२ सप्टेंबर २०१८ पासून पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.
याबाबत माहिती अशी गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक रेकॉर्ड वरिल पाहिजे असलेले व फरार आरोपींच्या शोधार्थ पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना त्यांच्या बतमीदातमार्फत माहिती मिळाली की पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार बाळू उर्फ संदीप भोसले हा थेरगाव येथील अशोका सोसायटीत येणार आहे. त्यानुसार नदाफ यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे यांना कळवून त्यांच्या सूचनेप्रमाणे त्या ठिकानी पथकाने सापळा लावला मिळालेल्या वर्णनाचा इसम दिसताच त्याला ताब्यात घेण्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या आरोपीला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी उपनिरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी भिवसेन सांडभोर, धर्मराज आवटे, मोहम्मद गौस नदाफ,राजाभाऊ बारशिंगे,मयूर वाडकर यांच्या पथकाने केली.