नियोजनाअभावी कचराकोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 06:37 AM2017-10-05T06:37:33+5:302017-10-05T06:37:42+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील वाढलेली कचरा समस्या, भटकी कुत्री, पिण्याचे पाणी या प्रश्नांवर चर्चा झाली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील वाढलेली कचरा समस्या, भटकी कुत्री, पिण्याचे पाणी या प्रश्नांवर चर्चा झाली. अधिकारी तेच आहे, ठेकेदार तेच मग कचरा प्रश्न कसा, असा प्रश्न सत्ताधाºयांनी विचारला. नियोजनाच्या अभावामुळे कचरा समस्या वाढल्याचा आरोप पदाधिकाºयांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. विषय पत्रिकेवर २३ विषय होते. ते मंजूर करण्यात आले. तसेच दहा ऐनवेळेसचे विषयांनाही मंजुरी दिली. वाढलेली कचरा समस्या, भटकी कुत्री, पिण्याचे पाणी या प्रश्नांवर चर्चा झाली.
सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘गेल्या काही महिन्यांत कचरा समस्या गंभीर झाली आहे. कचºयाच्या गाड्या आहेत, कर्मचारी आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव आहे. अधिकाºयांनी ठेकेदार आणि कर्मचाºयांकडून काम करून घेणे गरजेचे आहे. बदलण्याची मानसिकता काही जणांची नाही. अधिकारी तेच आहेत, ठेकेदारही तेच आहेत, मग कचरा समस्या कशी? नियोजन करण्यात प्रशासन कमी पडत आहे. अ प्रभागातील अधिकाºयांना आपल्याकडे किती कामगार आहेत, वाहने किती आहेत, याची माहिती नाही. यापेक्षा बेजबाबदारपणा कोणता असू शकतो. नियोजनाचा अभाव आहे. काही भागात आरोग्याचे चांगले काम होते आणि काही भागात समस्या गंभीर आहे. आता काम न करणाºयांवर कारवाई करण्याची गरज आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याचे पाणी उचलण्यात अडचण येते. परिणामी टाक्या न भरल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने जनता त्रस्त आहे.’’