कचरा निविदेतील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:17 PM2019-04-05T20:17:15+5:302019-04-05T20:34:33+5:30

कचरा निविदेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे

garbage contractor of tender process will be transfer in black list : appeal to Commissioner Shravan Hardikar | कचरा निविदेतील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन

कचरा निविदेतील ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन

Next
ठळक मुद्देदोन्ही ठेकेदारांना उच्च न्यायलयात जाण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती एका टनामागे चारशेचा फरक असेल तर मोठ्याप्रमाणावर बचत होणार

पिंपरी: कचरा संकलन आणि वाहतूक कामाचा दर्जा व उत्तम काम होईल. यासाठी महापालिकेचे ११६ कोटी रुपये नुकसान करुन ठेकेदारांना कामाचे आदेश दिले. मात्र, त्यांनी काम सुरू केलेले नाही. त्यामुळे जुण्याच ठेकेदारांकडून काम करण्याची नामुष्की ओढावली आहे. काम न करणाºया कचरा संकलन निविदेतील दोन्ही ठेकेदारांना काळया यादीत टाकावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्षनेते दत्त्ता साने यांनी केली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. 
कचरा निविदेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहरातील घरोघरीचा कचरा एकत्र करुन तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेणे या कामाच्या निविदेतील उच्च न्यायालयाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन बीव्हीजी व एजी एन्वायरो या कंपन्यांचे कामाचे आदेश थांबविण्यात यावेत. कारण या दाव्यामध्ये मनपा कायदा विभाग व आरोग्य विभागामार्फत नव्याने काढलेल्या ४ च्या निविदेतील निविदाकारांनी दरांची पाकिटे उघडण्याबाबत उच्च न्यायालयास कोणतीही विनंती केलेली नाही.  जाणीवपूर्वक दोन्ही ठेकेदारांना उच्च न्यायलयात जाण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती केली. बीव्हीजी व एजी एन्वायरोच्या दरांच्या दुलनेत नव्याने काढलेल्या ४ च्या निविदेतील निविदाकारांची दरपत्रके हि जवळपास चारशे रुपयांनी कमी आहेत. एका टनामागे चारशेचा फरक असेल तर मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. प्रतिदिन पिंपरी चिंचवड शहरातून हजार टन कचरा मोशी कचरा डेपो येथे  वाहून नेला जातो. वषार्ला १४ कोटी ६० लाख रुपए, तर आठ वर्षे एकुण ११६ कोटी ८० लाखाचा भार पडणार आहे. १ एप्रिलपासून दोन कंपन्यांनी काम सुरू केले आणि दोन दिवसातच काम बंद करण्याची नामुष्की ठेकेदारांवर आली. कच-याची समस्या सोडविण्यासाठी अकार्यक्षम असणाºया दोन ठेकेदार काम सुरू करण्यास चालढकल करीत आहेत. कामाचा दर्जा व उत्तम काम होईल. यामुळे महापालिकेचे ११६ कोटी रुपये नुकसान करुन ठेकेदारांना कामाचे आदेश दिले. मात्र, त्यांनी काम सुरू केलेले नाही. जुन्याच ठेकेदारांकडून पुन्हा मुदतवाढ देऊन काम चालू ठेवण्याची नामुष्की मनपावर ओढावली आहे. शहरात कच-याची समस्या गंभीर झालेली आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचलेले आहेत, त्यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.  व नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे.

Web Title: garbage contractor of tender process will be transfer in black list : appeal to Commissioner Shravan Hardikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.