कचरा डेपोचा त्रास, विविध प्रकल्प फक्त नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:40 AM2018-04-05T03:40:03+5:302018-04-05T03:40:03+5:30

मोशी परिसरात कचरा डेपोला लागलेल्या भयानक आगीने सर्वांचे लक्ष वेधले असून, आग लागल्यानंतर त्याचे लोळ भर रस्त्यावरून दिसत होते. अद्यापही परिसरात धुराचे लोळ पसरले असून आगीमुळे मोशीच्या कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 Garbage depot trouble, various projects are just names | कचरा डेपोचा त्रास, विविध प्रकल्प फक्त नावालाच

कचरा डेपोचा त्रास, विविध प्रकल्प फक्त नावालाच

Next

मोशी - मोशी परिसरात कचरा डेपोला लागलेल्या भयानक आगीने सर्वांचे लक्ष वेधले असून, आग लागल्यानंतर त्याचे लोळ भर रस्त्यावरून दिसत होते. अद्यापही परिसरात धुराचे लोळ पसरले असून आगीमुळे मोशीच्या कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सुफलाम व आरोग्यदायी असलेले शेतकरी वर्गाची लक्षणीय संख्या असलेले एक गाव. गावात ग्रामस्थांकडून गावगाडा सुरळीत सुरु असताना गावाचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्धार १९९७ ला कारण्यात आला. गाव महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत गावात विविध मते होती अखेरीस गावाचा पालिकेत समावेश झाला़ मात्र या गावाच्या लोकांना आजतागायत भेडसावत असलेला मुख्य प्रश्न म्हणजे आ वासून असलेला कचरा डेपो.
मोशी बोºहाडेवाडीकडून येताना समोर नजरेस दिसतो, तो मोशी कचरा डेपोचा भव्य डोंगर. हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे़ कारण सध्या औरंगाबाद येथे कचरा डेपोवरून सुरू असलेले आंदोलन बोलके आहे. कचरा डेपोवरून अनेक राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून घेतली खरी मात्र यामध्ये हाल झाले ते मोशीकरांचे हे वास्तव आहे. केवळ राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोशीकरांना कचरा डेपो हलवण्याचे सांगितले जाते. नंतर त्या कचरा डेपोबाबत केवळ चर्चाच होत असते प्रत्यक्ष सामना तर मोशीच्या सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
अद्यापही डेपोत लागलेल्या आगीमुळे धूर धुपसत असून त्याचा त्रास आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी सहन करत आहे़ प्रशासन केवळ तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना म्हणून लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत आग विझवण्यासाठी ५० ते ६० टँकर पाणी मारण्यात आले आहे. कायमस्वरूपी आग विझावी म्हणून आगीवर मातीही टाकण्यात येत आहे.
शहरातील दैनंदिन कचरा या डेपोमध्ये आणून त्यावर प्रक्रिया करून विविध प्रकल्प उभारले जातील. अशा प्रकारे या डेपोची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये कचरा डेपोला स्थानिक रहिवाशांनी विरोधदेखील केला. त्यानंतरही हा प्रकल्प सुरू झाला. आता तर त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, या डेपोत असलेले प्रकल्प फक्त नावालाच असून अनेक प्रकल्प आद्यपही सुरू करण्यात आले नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र परिस्थिती वेगळी असून नावालाच प्रकल्प असल्याचे दिसून येते.
नवीन कचरा डेपोला परवानगी नाही़ मुख्यमंत्र्यांनी नवीन कचरा डेपोला यापुढे परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे़ त्यामुळे शहरात अन्य ठिकाणी कचरा डेपो होणार नाही हे वास्तव आहे़ परिणामी सध्या मोशी कचरा डेपो हा सर्व शहराच्या दृष्टीने उत्तम पर्याय झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा कचरा याठिकाणी आणून टाकतात.

स्थानिक गावकरी कचरा डेपोसाठी एकत्र येणार?

सध्या मोशी गावाचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षाबरोबर या भागातील स्थानिक व गावकरी, सर्वसामान्य नागरिकांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. गावात मतभेद असल्यामुळे कचरा डेपोसारखा आरोग्यास हानीकारक प्रकल्प मोशीत यापूर्वी आला. मात्र भविष्यात त्याचे गावावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेऊन या कचरा डेपो प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा उभा करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्थानिक गावकी भावकी एकवटणार का हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title:  Garbage depot trouble, various projects are just names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.